पत्रलेखन-प्रसारमाध्यमांचे प्रेक्षकांना पत्र.

पत्रलेखन-प्रसारमाध्यमांचे प्रेक्षकांना पत्र. 

 



पत्रलेखन-प्रसारमाध्यमांचे प्रेक्षकांना पत्र.


 




                           



प्रति,

माझा आस्वाद घेणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग.

रा.:-आपापल्या घरी.

ता.:-गाव

जिल्हा :- शहर.

मु.पोस्ट :- जिथे आहात तिथेच.

पिन कोड :- १२३४५६.

दि. २८.१०.२०२०.





प्रिय,



पेक्षक वर्ग.



          सप्रेम  नमस्कार!!!



          कसे आहात सर्व.खूप दिवसापासून आपल्याशी बोलायचे होते.आज महाराष्ट्र कवी मंचाच्या पत्रलेखनाच्या उपक्रमातून संधी मिळाली.मी कुठलाही वेळ न दवडता लिहिण्यास सुरुवात केली. मी एक प्रतिनिधी आहे.कोणाची ते पात्राच्या शेवटी आपणास समजेलच.🙏



            माझी निर्मिती आपल्या मनोरंजनासाठी झाली होती.त्यात इतकी पटकन प्रगती होत गेली आणि मी आपल्या सर्वाच्या जीवनाचा कधी अविभाज्य घटक बनले कळलेच नाही.मला आपल्या बुद्धीचा अभिमान आहे पण याच बुध्दीला कुठे थांबायचे कळत नाही तेव्हा मला असे पत्र लिहावे लागते आहे. तुम्ही माझा किती वापर करता.मला बोलता येत नाही म्हणून मी कधी हँग होते,कधी गरम,तर कधी मला इतका स्ट्रेस येतो की,आपणास मला आमच्या डॉक्टर कडे घेऊन जावे लागते.बरी झाले तर ठीक नाहीतर स्मशानभूमी. ते ही तुम्ही कधी न्यायचा कंटाळा करता मग माझी विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नाही आणि मग हा इलेक्ट्रिक घन कचरा आपल्या घरी राक्षसी डोंगर बनून आपल्यालाच गिळंकृत करेल अशी मला भीती वाटते.मला आपली काळजी वाटली म्हणून मी हे पत्र लिहीत आहे आपणास वेळीच सावध करण्यासाठी.



           आपण माझा वापर इतका करता की,आपण घरदार,मुले, आई-वडील,नातेवाईक सर्वांना विसरून जाता.मी नाही तुम्हाला संकटात मदतीला येणार.तुम्हाला काही झाले तर मला काहीच फरक पडत नाही पण त्यांना खूप मोठा फरक पडेल तुमच्या जाण्याने कारण त्यांना भावना आहेत.माझ्या अती,चुकीच्या वापराने आपली भावी पिढी बरबाद होत आहे.याकडेही आपले लक्ष असू नये.लहान मुलांना शांत करण्यासाठी आपण जेव्हा लहानमुलांकडे मला जेव्हा सोपविता ना,तेव्हा त्यांच्या कोवळ्या डोळ्यांवर माझ्या किरणांचा इतका परिणाम होत असतो.नका ओ,कोवळ्या जीवाची शारीरिक वाढ थांबवू.त्यांच्या काय तुमच्याही शरीरावर खूप परीणम करतो मी.कधी तुमची सतत मला पाहून मान दुखते, सतत हाता पायांना मुंग्या येतात,कधी माझ्या अति आवाजाने बहिरेपणा येतो,कधी चष्म्याचा नंबर वाढतो,कॅन्सर आहेच,मेंदूवर ताण निर्माण होतो.अजून बरेच आजार आहे ज्यावर औषध ही नाही. मी म्हणत नाही तुम्ही माझा वापरच करू नका.प्रगती करू नका.पण कुठे तरी थांबा.मला आपले व्यसन बनवू नका.मलाही आपला सहवास आवडतो.जेव्हा आपण कुटुंबासोबत आपल्या आठवणींना उजाळा देता तेव्हा मी ही आनंदी होतो.तुम्ही आनंदात असता तेव्हा मी ही सुरेख गातो,नाचतो.माझा आस्वाद घायला आपणच नसाल तर माझा काय उपयोग आहे का? विचार करा नक्की आणि काळजी घ्या.



कळावे,🙏🙏🙏



                                         आपल्या सर्वांची आवडती,

                                                  प्रसारमाध्यमे.



***



                                                   



                             प्रेषक,

                     आपल्या सेवेतील

                      प्रसारमाध्यमे.

                      रा. :- तुमच्या जवळ.

                      ता. :- कंपनी.

                      जिल्हा:- विक्रेता.

                      मु.पो. :- खरेदीदार.

                      पिन.कोड. :- xyz.       

टीप:- आपल्याला माझे पत्र पोहचले असेल अशी आशा बाळगते व आपल्या अभिप्रायाची मनापासून वाट पाहते. 'प्रसारमाध्यमांचे प्रेक्षकांना पत्र'. कसे वाटले नक्की सांगा.असेच आणखी पत्र वाचण्यासाठी महाराष्ट्र कवी मंच ब्लॉगला भेट द्या🙏🙏🙏महाराष्ट्र कवी मंच स्पर्धेत पत्रलेखन समावेश.

Read more click here

मातृभूमी (कविता)

                           ********


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या