● मातृभूमी ●
***रचना:- आष्टाक्षरी***
कडे कपाऱ्याही गाती
परतंत्र्यातल्या राती
जपली मस्तकी माती
मायभूमितली नाती.।।१।।
स्वराज्याचा हा रक्षक
जाणता राजा दक्षक
शत्रू भुकेला भक्षक
हा मावळ्याचा लक्षक.।।२।।
देशाचे खरे तारक
घडले क्रांतिकारक
सांगती गाथा स्मारक
इति हा भावी बालक.।।३।।
नववधू परि माता
विविध अंगी समता
नांदते येथे ममता
विविध भाषी जनता.।।४।।
वायू, जल,भू नौदल
राही उभे दल दल
मृत्यु दारी हर पल
देशप्रेम हेच बल.।।५।।
गानकोकिळा ही गाते
नभ भरारी स्त्री घेते
किसान भुमीचे नाते
वंदन तुजला माते.।।६।।
***
सौ.स्वाती संदीप चौधरी.✍️
नवी मुंबई.
***टीप:- स्वरचित मातृभूमी (कविता) आवडली असेेल
तर लाईक करा.comment करा. ब्लॉगला subscribe करा.🙏🙏🙏***

1 टिप्पण्या