पुन्हा पुन्हा घेत राहू गाठी भेटी.

 # निरोपसमारंभानिमित्त

 कविता 

*पुन्हा  पुन्हा  घेत  राहू  


गाठी  भेटी.*  

निरोपसमारंभानिमित्त  कविता



जीव एकमेकात गुंतलेला 

फुलांचा फुलपाखरांशी लळा.


 सुपेंच्या अंगणात फुललेला 

नात्यांचा मनमोहक मळा.


रूणुझुणू रूणुझुणू ताल मृदुंग वाजे

गणपतीत आरतीचा सुर गाजे.


उकडलेल्या मोदकाचा ग्रूपमध्ये पसरलेला वास डोसा,उपमा,खिचडी,केकचा लाभलेला सहवास.


मटणाच्या भाजीवर तरंगलेला तेलाचा रस्सा

सोबतीला एखादा चटकदार मसालेदार किस्सा.


काका काकूंच्या बटव्यात भरलेली खाऊची ओंजळ

मुलांसाठी चित्रनगरीत रंगलेलं रंगीबेरंगी आजोळ.


आरोहिच्या नखरेल आदानी गाजलेल्या आदा

मिकूच्या रवांडातील रात्री बऱ्याच झोपलेल्या सदा.


पृथ्वीच्या सूर्याभोवती रोजच्याच भेटी

पुन्हा पुन्हा घेत राहू गाठी भेटी.      


सूपेंच्या कुटुंबासाठी सुचलेली छोटीशी कोटी

भावी आयुष्यासाठी शुभेच्छा कोटी कोटी.

🌹🌹🌹

                                           ✍️ सौ.स्वाती संदीप चौधरी.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या