रंगवलेली बोलकी पुस्तकं.(कविता)

मुक्तछंद रचना.

रंगवलेली बोलकी पुस्तकं. (कविता)


आजही पुस्तक पेठेत गेलंकि पुस्तक खुणावतात

काही लक्ष वेधून घेतात तर काही पॉकेटमणीतून घरी येतात.

एक काळ होता पुस्तक नुसतं पाहण्यासाठी जिवाचं रान करावं लागायचं.

तेव्हा त्याचं नुसतं दर्शनही अमूल्य असायचं।


आज ती सहजासहजी उपलब्ध होतात त्यामुळे असेल कदाचित 

पुस्तकांशी बोलणं दूर आज माणसाला माणसाशी बोलणंही महाग झालंय.

अशावेळी वाचताही नव्हतं येत तेव्हा चित्राशी हितगुज करणारा माणूस आठवतो।।


एक तीळ सात भावंडांनी वाटून खावा तसं एक पुस्तक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हायचं

तरी ते कधी नावंकोर तर कधी दाढीमिश्या असणाऱ्या मणसांगत बोलकं असायचं.

त्यातूनच मग एका पिढीतून कोणी कवी तर कोणी व्यंगकार जन्माला घ्यायंचं।।।


आयुष्याच्या शेवटी पुस्तकाचंही एक एक पान मग गळतीला यायचं 

अन नवपिढींन त्याचं एक एक पान जपत ठिगलागत जुनंच पुस्तक नव्या थाटात वापरायचं यासारखं सुख ते काय हे पुस्तक भरभरून बोलायचं।।।।


आज त्या पुस्तकाची जागा मोबाईल, लॅपटॉप अन कॉम्पुटरणं घेतली तरी त्या कागदाला आपल्याला कोणीतरी पहावंस वाटतंय.

त्याच्यावरच्या चित्रांना आपल्याला थांबलेलं पाहून खूप काही बोलावसं वाटतंय।।।।।

                        ***एस.एस.चौधरी***


***टीप:- पुस्तकं वाचताना कविता करण्याचा छंद जडला आणि 

रंगवलेली बोलकी पुस्तकं.(कविता) सादर झाली.कविता कशी वाटली नक्की comment करा.🙏🙏🙏***



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

शृंगार लेखणी1005 म्हणाले…
पुस्तक वाचनाचा छंद जोपासता जोपासता पुस्तकाच्या सानिध्यात सुचलेली कविता कशी वाटते नक्की कळवा. आवडल्यास शेअर करा.