रंग बदलू गिर्गीट म्हणजे काय याचा नेमका अर्थ आजकाल अनुभवास येत आहे.वर्तमान पत्र किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहावा की नाही हाच प्रश्न पडतो.आपण लोकशाही देशाचा एक भाग आहोत हा गर्व असावा की अभिमान हा मला जसा प्रश्न पडतो तसा तुम्हालाही पडतं असावा.सोशल मीडिया चांगला की वाईट हा प्रश्न नंतर विचारमंथनात घेऊया पण खरंच आपण जागृत नागरिक आहोत का ओ? संविधानाने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलाय मान्य पण आपण खरंच विचार करून बोलतो का ओ? उचलली जीभ लावली टाळ्याला असंच न्युज वाचताना वाटत राहतं.मग नंतर का बोलो,कसं बोलो,कशाला, केव्हा ही सगळी सारवा - सारव.
असतं वेगळंच आणि दाखवलं जातं वेगळंच. आपणही वेड्यासारखं भरकटत जातो या जंजाळात काही like आणि comment मिळवण्याच्या नादात विसरून जातो काय बरोबर काय चूक...
हेच पहा ना.आपला तिरंगा त्याचे रंग,त्या रंगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेलाय आज. एक काळ होता हिरवा रंग समृद्धीचा,पांढरा शांततेचा,केशरी विरतेचा,जवानांनी दिलेल्या बलिदानाचा शेतकऱ्यांच्या श्रमाचा असं कितीतरी प्रोत्साहन देणारे रंग आज आपण कुठे हिंदू-मुस्लिम, क्रोध,आणि बहिष्कार यात बदलून टाकलेत.रंग आज प्रतीक राहिलेच नाहीत ती हत्यार झालीत देश बाटण्याची, जातीयवाद पसरविण्याचे,दहशतवाद वाढविण्याची,दोन देशातला दुरावा वाढविण्याची...
खरंच या रंगांनाही मानवी प्रवृत्तीचा राग येत असेल ना...समस्या सोडवायला रंग कामी येणार का ओ... त्यांना का भरकटवतोय आपण आपल्यासोबत.मानवी वृत्ती बदलायला हवी.माझ्यावर वेळ आली की पाहू म्हणण्यापेक्षा कोणावरच ही वेळ इथून पुढे नको हा बाणा आपल्या वागण्यात हवा.
इतिहास जमा समाजसुधारक प्रेरणा देणारेच राहु देत.त्यांनीही विचार केला नसेल ज्या जाती समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण लढलो त्याच जाती आपल्याला मरणोत्तर बाटतील. त्यांनी देशाचा विचार केला म्हणून आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय आपल्या पुढील पिढीनेही ते मानानं उपभोगावं वाटत असेल तर अपल्यापासूनच समाजसुधारण्याचं काम सुरू केलं पाहिजे कारण आपणही या समाजाचा एक भाग आहोत.
थोडा विचार करूयात, पटलं तर करूयात,बोलायचं म्हणून न बोलता विचार करून बोलूयात आणि आपल्यातले सुप्त रंग इंद्रधनूपरी समाजात उधळूयात आणि फक्त आपला देश नव्हे तर पूर्ण मानवजातीला गर्व वाटावा असं काहीतरी करूयात.समाजाला लागलेली आतंकवाद,बलात्कार,जातीयवाद आदी कीड समूळ नष्ट करूया एक सुंदर जग पुन्हा नव्याने बनवू यात.....
जय हिंद!!!
***एस. एस. चौधरी***
***टीप:- हा रंग...(लेख) आवडला असेल तर comment नक्की करा.🙏🙏🙏***

1 टिप्पण्या