बालपण.(लेख)


               

बालपण.(लेख)

 

              बालपण आठवणीत रमून जाताना काल सहज विचार आला, का नाही सुरुवात रोपापासूनच करावी.घाबरू नका,मी काय वृक्षारोपण बद्दल बोलत नाही आहे.बालपण एक रोपचं असतं ना...किती योग्य अयोग्य खतपाणी घातलं त्यावरच जीवनाचं संस्काररूपी बीजारोपण या वयात कुठेतरी होत असतं असं माझं मत आहे.

             आजची लहानमुल पहिली की प्रश्न पडतो?कुठेतरी हरवलंय ते बालपण मोबाईल अन कॉम्प्युटरच्या जगात.माझ्या लहानपणी आठवतं आई वडिलांना चुकवून खेळ खेळावा लागायचा तरी त्यांना कुठूनतरी सुगावा लागायचाच मग काय बिना साबणाची धुलाई ठरलेलीच.पण आज तसं नाही आहे.काळासोबत विचारही बदलत आहेत.आई-वडील मुलांना खेळा म्हणतात तरी मुले मोबाईल आणि कार्टून यांच्याच भोवऱ्यात अडकलेली दिसतात.त्यात त्यांनाही पूर्ण दोषी मानता येणार नाही.

               लहानपणीच मूल रडायला लागलं कि त्याला शांत करण्याचा जालीम उपाय आपण पालकांनी शोधून काढलाय मोबाईल व टीव्ही तात्पुरता तोडगा निघतो पण ती पुढे कायमची सवय बनायला कितीकसा वेळ. याच सवयी मग पुढे खेळाची पूर्ण व्याख्याचं बदलून जातात.

               आज मुलांना विचारलं तुला मोठ्यापणी काय व्हायचं तर मुलांची उत्तरं ठरलेली असतात माहीत नाही?ठरवलं नाही अजून?मेरिट लिस्ट वर ठरवू.....

                मला माहित आहे आज स्पर्धेचं युग आहे पण आपल्याला नेमकं काय आवडतंयं आणि काय करायचं आहे हेच माहीत नसेल तर आपण कोणतं धेय्य गाठणार आहोत हाही प्रश्नच आहे.एक काळ होता या प्रश्नांची उत्तरं लहानपणीच मिळायची माध्यम कोणतंही असो....

                 खेळ कि बालगीत प्रेरणा द्यायचे. आज ते प्रेरणास्थान हरवलंय कॉम्प्युटरच्या खेळण्यात अन टीव्हीच्या कार्टून्स मध्ये. पण आपलं कार्टून खरंच बालपण जगतंय का याचा नक्की विचार करा!

                पैसा गरज आहे आयुष्य नाही.एका गरजेच्या चालनासाठी आपलं अनमोल रत्नं भरकटून हरवू देऊ नका.बालपणी त्याला थोडंस प्रेम अन संस्कार हवे आहेत.लाडात त्याला बिघडून देऊ नका एवढाच या लेखातून विचार व्यक्त करते अन आपला या लेखापुरता विराम घेते.लेख कसा वाटला नक्की कळवा......धन्यवाद!!!


***टीप:- बालपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा! बालपण लेख कसा वाटला नक्की comment करा.🙏🙏🙏***


                            ***एस. एस. चौधरी***

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

शृंगार लेखणी1005 म्हणाले…
आपल्या बालपणातील गोड आठवणी आम्हाला वाचायला नक्की आवडतील.🙏