ओवी(कविता)



ओवी(कविता)


.खेळ ऊन पावसाचा.


खेळ ऊन पावसाचा

स्वर गडगडाटाचा

उन्हातल्या पावसाचा

रंग सोनेरी मनी.।।१।।


इंद्रधनू पसरला

कवी मेळावा भरला

रंगबेरंगी रंगला

लपंडाव काव्याचा.।।२।।


भासे हर्षित गारवा

सैरभैर हा पारवा

उडे पाखरांचा थवा

हा शोध घेण्या नवा.।।३।।


वटवृक्ष जीवनाचा

सळसळाट पानाचा

खो-खो हा सुख दुःखाचा

रंगतो घन दाटी.।।४।।


सापशिडी चढे पारा

पावसा आडवी वारा

खेळ हा जिंकतो सारा

मांडुनि डाव रडी.।।५।।

          ***


 २.कष्टाची भाकर.


गोड कष्टाची भाकर

पाखरं हाकी लेकर

पोटभरीचा ढेकर

तृप्त होई चाकर.।।१।।


एक दाणा भूमी पोटी

भरून वाहे ही ओटी

निसर्गाची काया खोटी

घास तोंडाचा लोटी.।।२।।


ऊन पावसाचा मारा

झेली गारपीट वारा

दाणा ओलांडतो दारा

गाठी आनंदी पारा.।।३।।


भाव मिळे दस बीस

जीव होई कसा वीस

कधी दावे सुगी दिस

हताश हाती विष.।।४।।


दलाल मालकी मावा

शेतकरी राही गावा

आपण भाकर खावा

त्यानं उपाशी रावा.।।५।।

        ***


सौ.स्वाती संदीप चौधरी.✍️

नवी मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

शृंगार लेखणी1005 म्हणाले…
ओवी रचनेतील दोन विषय रेखाटले आहे.१. जीवनातील विविध पैलू रेखाटतो.तर दुसरा आपल्या आहारातील रोजच्या भाकरीचा प्रवास.वाचून नक्की कळवा.शेअर करा🙏