आरसा.(काविता)


आरसा.(काविता)


'आरसा (कविता) '


आपण रोज आरश्यात पाहतो

दिसतोही सुंदर स्वतः ला

  पण सांगायचं विसरतो
   किती सुंदर ते...||१||
   
मग दाखवतो एखादा आरसा

पहातोही आपण त्यात स्वतःला


मग होतो कधी उदास,हताश,


निराश,भ्रमिस्ट उगाच...||२||



येतो मग आरसा पुन्हा भेटीला


पहातोही आपण पुनः पुनः स्वतःला


यावेळी नक्की सांगतो किती


सुंदर आहोत ते।।३।।


मग दाखवतो स्वतःला आरसा


पहातोही स्वतःला आपण त्यात


मग घेतो कधी उभारी, भरारी


गगनात आरपार...||४||


★कवियत्री सौ. स्वाती संदीप चौधरी★
           नवी मुंबई.

****टीप:- "आरसा कविता " आवडली मग नक्की comment करा.****



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या