आजचा तरुण पाहिला की, दोष कुणाला द्यायचा? हा प्रश्न डोक्यात नक्की येतो.आपण किती सहज म्हणतो त्याला काही काम नाही,बोंबलत फिरतोय नुसता,वेसनाच्या आहारी गेलाय नुसता मग ते दारू असो की मोबाईल.मग आई वडीलही पुढे जाऊन वैतागून म्हणतात जीव द्ये कुठेही पण त्यांनाही असं म्हणताना अंतर्मन किती खोल यातनामय होत असेल याचाही त्या पठ्याने कधी विचार केला नसेल आणि त्या रागात स्वतःचा जीवही गमावला असेल.पण खरंच आजचा तरुण खरंच वाया गेलाय का ओ?हा विचार दोन दिवसांपासून माझ्या मनात डोकावत आहे. चला तर मग आज करूयात त्याच्या बाजूनेही थोडा विचार.....
आता त्याच्या शिक्षणाची सुरुवातच इंग्लिश की मराठी यातून होते त्याला काय आवडतं,काय सोपं जाईल,काय गरजेचं आहे याचा आपण त्याच्या दृष्टीने कधी विचार केला का हो...केला ही असेल काहीजणांनी अपवादात्मक.मग ते असं शिक्षण दहावी बारावी होतं पूर्ण त्यात पण पुढे काय हे प्रश्न तसेच निरुत्तरी असतात.मग तू इकडे जा तिकडे जा....पण पुढे कुठे आणि कसं हे कोणीच नाही सांगत मग हाच तरुण इथून भरकटत जातो.
माझ्याकडे डिग्री आहे मी नोकरीच करायला हवी ती पण साहेबाचीच हा पहिला भ्रम. मग या डिग्रीच्या तोऱ्यात जेव्हा अपयश पदरी पडतं ते कसं पचवायचं कोणी शिकवलेलंच नसतं. मग ते पचवायला आयुष्याची पंचविशी तिशी गाठली जाते आणि आयुष्य खऱ्या अर्थाने जगायचं राहून जातं.
प्रश्न सगळेच मांडतात उत्तर कोणीच देत नाही पण मी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखातून करत आहे पटलं तर घ्या.पहिले कोणतंही काम छोटं नाही हे मनाशी पक्के ठरवा मग ते शेती असो घरकाम की बिगारी कारण प्रत्येक छोटा माणूस हा एका मोठ्या माणसाचा हिस्सा असतो.आपण फक्त तो मोठा माणूसच पाहतो.माणूस किती मोठा हे नका पाहू त्याचे प्रयत्न आणि अपयश किती मोठं होतं आणि त्याने ते कसं पचवले ते शिका.....कारण तुम्ही काय शिकता हे फार महत्त्वाचं आहे.
व्यावसायिक ज्ञान घायला शिका माझ्यामते खरं शिक्षण तेच आहे.मग ते आईकडून स्वयंपाक शिकणं असू द्या नाहीतर बाबांकडून भाजी विकणं कारण उद्या तुम्हाला नोकरी नाही लागली तर स्वयंपाक येतो म्हणून तुम्ही उपाशी नाही राहणार आणि व्यावसायिक ज्ञान असल्यामुळे तुम्हाला पैसा ही मिळेल आणि तो कसा वापरायचा हे ही तुम्ही तुमचं नफा-तोटा तत्वावर शिकाल मग कुठेही फिरण्याची किंवा संकटांना घाबरून पळून जाण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही.
अजून एक वर्ग आहे प्रेमी युगलांचा खरं प्रेम काय याचा नीटसा अर्थही न उमगलेले तरुण एका तरुणीसाठी आपलं आयुष्य संपवतात तेव्हा त्यांना विचारावं वाटतं जिच्यासाठी तुम्ही तुमचं जीवन संपवता तिचं आणि तुमचं खरंच प्रेम होतं ना...विचार करा मग ते प्रेम असेल तर दोन वेळेचा अन्नाचा प्रश्न समोर दत्त म्हणून उभा असताना तुम्हाला स्वतःच्या पोटाला चिमटा काढून अन्न भरावणाऱ्या आई-वडिलांच्या त्यागाला काय म्हणतात याचा विचार नक्की करा आणि खरं प्रेम करायला शिका, जमलं तर प्रेमात मरायला नाही तर जगायला शिका.
प्रत्येक वयातला आनंद टिपायला शिका,विद्यार्थी दशेत ज्ञान संपादन करून ते ज्ञान योग्य ठिकाणी वापरायला शिका,एकदा नापास झालं म्हणून आयुष्य संपत नाही आयुष्याचा पेपर पास व्हायला शिका.आत्महत्या हे समस्या चे उत्तर नाही प्रश्न नीट समजून उत्तर शोधायला शिका.कोणताही प्रश्न एवढा अवघड नसतो हे तुम्हाला प्रश्न सुटल्यावर नक्की समजेल.
स्वराज्याच्या मावळ्यांनी मराठ्यांचा इतिहास जसा घडवला तसा आजचा तरुण सागर एक मोठ्या महासागरात विलीन झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कोणताही मराठी मोर्चा काढण्याची भावी काळात गरज भासणार नाही.अशी आशा बाळगून हा लेख इथे संपन्न करते.
जय हिंद!जय तरुण भारत!!
सौ.स्वाती संदीप चौधरी.
नवी मुंबई.
***टीप:- Literature book प्रकाशित आजचा तरुण लेेेख
कसा वाटला नक्की सांगा.🙏🙏🙏***

0 टिप्पण्या