अनाथांची आई मदर टेरेसा.(लघुकथा)


अनाथांची आई मदर टेरेसा.(लघुकथा)




                     "अनाथांची आई मदर टेरेसा' याांना लोक अनाथांची आई का म्हणतात? छोट्या अणूने निरागसपणे प्रश्न विचारला." आईने आणूला जवळ घेत उत्तर दिले. "बाळ, मी तुझी आई म्हणून तु मला इंग्रजीत 'मदर' म्हणतेस हो ना,तसे 'मदर टेरेसा' या अनाथ मुलांच्या आई होत्या.त्यांनी आपल्या समाजकार्यावर आईसारखं प्रेम केले. आज म्हणून त्यांना मदर तेरेसा म्हणतात.छोट्या अणुसाठी एवढं उत्तर पुरेसं होतं.       
              मानवतावादी समाजसेविका अल्बेनियम महिला व शांतातेच्या नोबेल  पारितोषिक मानकरी.सामान्य घरात जन्मल्या असल्या तरी समाजकार्याची ओढ, कुष्ठरोग्यांची सेवा,अनाथालये, शाळा, फिरती रुग्णालये ई. आदर्श आजच्या पिढीपुढे ठेवणाऱ्या मदर तेरेसा.
               आई विचार करु लागली; "मी 'मदर टेरेसा'नाही पण मी एक 'आई' आहे.साधं रोजचे उरलेले अन्न कचरपेटित न टाकता गरजवंताला दिले तरी एक समाजकार्य घडेल".

सौ.स्वाती संदीप चौधरी.
नवी मुंबई.

  ***टीप:- अनाथांची आई मदर टेरेसा.(लघुकथा) ही माझी स्वरचित रचना आपणास कशी वाटली नक्की comment करा.🙏🙏🙏




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या