'प्रणू चाराक्षरी.(कविता)'
१. *आठवण *
आठवणओलसर
गेलेल्याची
खोलसर.।।१।।
आठवण
क्षणभर
साठवण
मणभर.।।२।।
रोजचीच
उठबस
वेदनेची
ठसठस.।।३।।
आठव हे
सैरभैर
पाखरांची
भिरभिर.।।४।।
आईचीच
भासे कुस
आठवण
मोरपीस.।।५।।
***
गेलेल्याची
खोलसर.।।१।।
आठवण
क्षणभर
साठवण
मणभर.।।२।।
रोजचीच
उठबस
वेदनेची
ठसठस.।।३।।
आठव हे
सैरभैर
पाखरांची
भिरभिर.।।४।।
आईचीच
भासे कुस
आठवण
मोरपीस.।।५।।
***
'प्रणू चाराक्षरी.(कविता)'
२. *शृंगार कवितेचा *
शृंगार हा
कवितेचा
दरबार
भावनेचा.।।१।।
शब्दांचाच
भरतसे
मोगरा हा
फुलतसे.।।२।।
कवितेचा
साज घडे
रचताना
शब्द खडे.।।३।।
वही,पेन
सोबतीचा
अनुभव
भोवतीचा.।।४।।
चुके ठोका
काळजाचा
हा ठिपका
काजळाचा.।।५।।
ओळीवरी
टिपतसे
झुमका हा
डुलतसे.।।६।।
वाचकांची
पसंतीसे
शृंगारिका
कवितासे.।।७।।
***
'प्रणू चाराक्षरी.(कविता)'
३ *.निसर्गाचा कोप.*
निसर्गाचा
कोप झाला
महापूर
घरी आला.।।१।।
सजीव न
घरदारे
वाहुनिया
नेले सारे.।।२।।
उसळे ही
लाट लाट
सागराची
चुके वाट.।।३।।
सोबतीला
हा भूकंप
निसर्गाचा
एक संप.।।४।।
नयनांचे
बांध फुटे
धरणीला
कंप सुटे.।।५।।
त्सुनामीचे
रूप पाही
पेटला हा
वणवा ही.।।६।।
वाऱ्याचे ही
ग्रह फिरे
भोवऱ्यात
जीव उरे.।।७।।
विध्वंसक
भासे सृष्टी
सवे एक
नवी दृष्टी.।।८।।
***
'प्रणू चाराक्षरी.(कविता)'
४. *आईपण.*
बिजातूनी
उमलते
फुलापरी
फुलवते.।।१।।
आईलाही
माया फुटे
दुधाचाही
पान्हा सुटे.।।२।।
बाळाचा ही
मुखडा हा
काळजाचा
तुकडा हा.।।३।।
अनाथांची
एक आई
सावली ही
असे माई.।।४।।
देवकीचा
नंदलाला
यशोदेचा
कान्हा झाला.।।५।।
धारवू ही
झाली माता
शिवबांची
जिजामाता.।।६।।
पाठीवरी
घेई लेक
झाशीराणी
लढे थेट.।।७।।
हिरकणी
गडावरी
ओढ तिची
बाळ घरी.।।८।।
दाखले हे
आईपण
सजविते
बाईपण.।।९।।
***
उमलते
फुलापरी
फुलवते.।।१।।
आईलाही
माया फुटे
दुधाचाही
पान्हा सुटे.।।२।।
बाळाचा ही
मुखडा हा
काळजाचा
तुकडा हा.।।३।।
अनाथांची
एक आई
सावली ही
असे माई.।।४।।
देवकीचा
नंदलाला
यशोदेचा
कान्हा झाला.।।५।।
धारवू ही
झाली माता
शिवबांची
जिजामाता.।।६।।
पाठीवरी
घेई लेक
झाशीराणी
लढे थेट.।।७।।
हिरकणी
गडावरी
ओढ तिची
बाळ घरी.।।८।।
दाखले हे
आईपण
सजविते
बाईपण.।।९।।
***
सौ.स्वाती संदीप चौधरी.✍️
नवी मुंबई.
***टीप:- "प्रणू चाराक्षरी.(कविता) "
ही रचना मी WhatsApp अंतर्गत ग्रूपमध्ये शिकले.याच वेळी या रचनेचे नियम वाचून मी चार रचना केल्या आणि विशेष या चारही रचनेनुसार मला poet of week किताब ग्रुप मध्ये मिळाला होता.नवीन शिकण्याचा खरा आनंद मी त्यावेळी अनुभवला.आपणासही कविता आवडल्या तर नक्की like,comment, share करा.🙏🙏🙏***

1 टिप्पण्या