हळदी- कुंकू.(लेख).


 (मकरसंक्रांतीच्या निमित्ताने)

हळदी- कुंकू.(लेख).


              'हळदी-कुंकू' म्हंटलं की,आम्हा बायकांची छाती कशी छत्तीस इंच फुगते. मग काय एखादा किताब मिळाल्याच्या माणात आम्हीही तो स्विकारायला जातो.आता मकर-संक्रांतीचं वारं वाहत आहे.म्हंटलं चला,यावरच एक सुंदर विचार मांडुयात.अर्थातच तो सुंदर आहे का नाही हे तुम्हीच ठरवा.पटला तर थोडा विचारही नक्की करा...सुरुवात माझ्यापासूनच करते.


               मुलीच्या आयुष्यात लग्न हा असा संस्कार आहे.ज्याने तिचं आयुष्यातलं स्थानच बदलून जातं.अर्थात,मुलावरही हा संस्कार होतो म्हणा पण त्याचा त्याच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही.असो आपण आपल्या विषयाकडे वळूयात.तर मुलीला लग्नाची चाहूल लागताच हळदी-कुंकुवाचा पहिला वौसा मिळतो तो मकर-संक्रांतीलाच.कधी विचारही करत नाही आपण हेच हळदी-कुंकू आपल्या आयुष्यात किती म्हत्वाचे असतं. सौभाग्याचे लेणे लेऊनच ते जन्माला येतं.


               मी कोणी सुधारक नाही.हा फक्त माझा विचार आहे.माझं लग्न झाल्यावर मी प्रथमच एका जवळच्या अंत्यविधीला जवळून पाहिलं. हे मी यासाठी म्हणत आहे;कारण मी त्यादिवशी खूप भावुक होऊन दृष्टीने तो प्रकार अनुभवला.त्या मृतदेहाला एवढं महत्व प्राप्त होतं की,त्याच्या मागे राहिलेल्या अर्धांगिला ते पूर्ण गमवावे लागतं.


                 त्यादिवशी त्या स्त्रीचा नुसता दागिनाच अग्नीत  पडत नव्हता.तर जगण्यातला स्वाभिमानच गळून पडत होता.जो दागिना तिचा आजवर रक्षक होता तोच पुढे भक्षक होऊ पाहत होता.असंच एक दिवस माझं एका विधवेशी संवाद चालू होता आणि तिच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला कुंकू लावण्याचा अधिकार नाही याची खंत व्यक्त होत होती.


                 यावरून,मला एक समजलं आम्हा बायकांचा आनंद खूप छोटा असतो.चार भिंतीतल्या मर्यादेतला मग या रूढी -परंपरा का तो हिरावून घेतात.का? आपण सतत हळदी-कुंकू समोर आलं की त्या स्त्रीला आपला पती सोबत नसल्याची तीव्र जाणीव करून देत असतो.तिला या हळदी-कुंकुवाच्या निमित्ताने एक छोटासा आनंद तर देवूयात ना फुल न फुलाची पाकळी म्हणून की तू ही एक सौभाग्यकांशींनी आहेस.युद्धात पती गेला तरी तूच खरी त्याच्या घराची सौरक्षक भिंत आहेस.


                  मकरसंक्रांतीच्या या शुभमुहूर्तावर अनिष्ठ रुढीपरंपरांचा गळफास करून नवीन विचारांचं एक छोटंसं रोपटं लावून त्या सौभाग्यवतींना वाण देवूयात आणि खऱ्या अर्थाने, ही संक्रांत गोड करूयात.......आपण सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.......


                          ***एस.एस. चौधरी***


***टीप:-  ''हळदी- कुंकू.(लेख). ''यातील माझे विचार आपणास पटले असेल तर नक्की comment करा.माझा कोणाच्याही भावना दुखवण्याचा किवा रूढी परंपरा ना खत पाणी घालण्याचा विचार नाही आहे.या लेखात मी माझे मत व्यक्त केले आहे.🙏🙏🙏***

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

शृंगार लेखणी1005 म्हणाले…
हळदी- कुंकू आणि स्त्री यांचे नाते व महत्व सांगणारा लेख रेखाटला आहे.कसा वाटला नक्की सांगाल.आपले मत जरूर मांडा.🙏