स्टेशन बसस्थानकावर उभी असते
फाटक्या कपड्याने सर्वांग झाकते.
नुसत्या पाण्यानीच पान्हा सोडते
पदराखाली बाळाची तहान भागते.
।।१।।
उन्हा तान्हातही दारोदारी फिरते
सुया-बीबं विकत दिस काढते.
विसाव्याला मग घर गाठते
पोरासाठी शिळी भाकर वाढते.।।२।।
कपड्यावर भांडे घ्या विणवते
पाठीवर तान्हे बाळ कळवळते.
सावरीत गल्ली बोळ फिरते
भूक क्षमविण्याचे कोडे पडते.।।३।।
घर काम करता करता
शिड्या भरभर चढते उतरते.
हिरकणी रोज घरास पळते
बाळासमीप एक आई उरते.।।४।।
पाहता बाळाची गगन भरारी
तिच्या आयुष्याला येते उभारी.
ईश्वराचे आम्ही सदैव आभारी
प्रत्येकाचीच आई असते भारी.।।५।।
***
***सौ.स्वाती संदीप चौधरी.✍️***
कामोठे,नवी मुंबई.

1 टिप्पण्या