गौराई... आज कोरोनाने हाहाकार माजवला आहे.यंदा घरी गौराई कशी आणावी सुजाताला खुप मोठा प्रश्न पडला होता.तीने सासुबाईना हा विचार मांडला.
त्यावर ससुबाई,"अगं वेडा बाई गणपति आले की,गौराई आलीच.आपली परंपरा आहे ती. कोरोनाच्या काळात आपणास जमाव टाळायचा आहे.सण-उत्सव नाही.आपण असं करुयात, सुंदर देखावा बनवूयात "घरी रहा,सुखरूप रहा" आणि तुझे काय ते फेसबुक,व्हाट्सअप्प त्यावर फ़ोटो टाकुयात.आपल्या घरी महालक्ष्मी येईल आणि समाजात जागृती.
सुजातालाही सासुबाईचे म्हणणे पटले, समाजाची बंधने आपल्या हितासाठी असतात हा विचार करत ती उत्साहात गौराईच्या अगमनाची तयारी करू लागली.🙏
सौ.स्वाती संदीप चौधरी.
नवी मुंबई.
****टीप:- आली गं दारा माझी गौराई. लघुकथा कशी वाटली नक्की
Comment करा.🙏🙏🙏***

1 टिप्पण्या