नाणं.(कविता)



नाणं.(कविता)







काल सहज चार आण्याकडे लक्ष गेलं

एके काळी त्यालाही वाण्याकडे माज होता.

भाव गेला कि बाजारही ढासळतो

त्याला कुठं ठाव होता।।१।।




येतात अन जातात दिवस ऊन पावसाचे

तसे दिवस पाचशे हजाराचे होते.

दिवस सरता मातीही अनमोल होते

मातीलाही कुठे ठाव असे।।२।।



खोटे नाणे ही शोपीस मध्ये सजते

अन कोण म्हणते,

नाणे फक्त पैश्यातच चालते.

अहो, अर्थ असला कि नाणे

म्हणीतही खणखणीत वाजते।।३।।



जुन्याचेही दिवस येतात

नव्याची झालर घेऊन

अन नाण्याचेही म्युझिअम होते

इतिहासाची साक्ष लेऊन।।४।।

                 ***कवयित्री एस.एस.चौधरी***

                              नवी मुंबई






टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

शृंगार लेखणी1005 म्हणाले…
रोजच्या जीवनातील वापरातील चलन पाहून सुचलेले विचार या कवितेत बद्ध केले आहेत.🙏