आई एक शृंगार.(कविता)




आई एक शृंगार.(कविता)




नसे कसला शृंगार तरी
किती सुंदर दिसतेस तू...।।धृ।।
हसताना बोलती फक्त डोळेच तुझी
दुःख छान लपवतेस तू...
वेदनेची कळ येता उरी 
जागीचं बसुनि घलावतेस तू...
यातना छान लपवतेस तू.....।।१।।
असे तुझी स्वप्न गगनभरारी
स्वप्नातही न बघतीस तू...
वाहिले सर्व आयुष्य आमच्या चरणी
आमच्यासाठी स्वप्न शृंगार तू...
पैंजणांची किण कीण छान लपवतेस तू.....।।२।।


हातांच्या भेगान मधली नक्षी तुझी
मेहंदीच्या रंगातही न दड़वतेस तू...
रंग मेहंदीचा उडून जाई
क्षणिक शृंगार रचतेस तू...
आई नावात सजतेस तू.....।।३।।


*कवियत्री सौ.स्वाती संदीप चौधरी.*
नवी मुंबई.


***टीप:-   "आई एक शृंगार कविता "  आवडली.like,,share .🙏🙏🙏🙏***

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

शृंगार लेखणी1005 म्हणाले…
या कवितेत आईचे सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🙏🙏